Tuesday, April 23, 2024
Homeनगरबुरुडगाव कचरा डेपो बंद करा

बुरुडगाव कचरा डेपो बंद करा

अहमदनगर (प्रतिनिधी)

नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख जालिंदर वाघ यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. याप्रसंगी जालिंदर कुलट, बाळासाहेब जाधव, राधाकिसन कुलट आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगाव येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. येथे शहरातील कचरा, घाण व इतर सर्व टाकावू पदार्थ टाकण्यात येतात. त्यास बुरुडगावच्या नागरिकांचा पहिल्यापासून विरोध होता. काही शेतकरी हरित लवादाकडे सुद्धा गेलेले आहेत. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत प्रशासनाने १० सप्टेंबर २०२० रोजी मनपास ना हरकत प्रमाणपत्र (दाखला) काही अटी व शर्तीने दिला होता. परंतु मनपाने सदर अटी व शर्तीचे पालन केलेले नाही व संपूर्ण गावाचा विश्वासघात केला. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा घेवून ना हरकत दाखला रद्द करण्याची मागणी केली. तसा ठरावही करण्यात आला.

याप्रसंगी जालिंदर वाघ म्हणाले, बुरुडगांव येथे कचरा डेपो असण्याचा काही एक संबंध येत नाही. कारण मनपा ने स्थापनेनंतर संपूर्ण शहरासाठी विकास आराखड्यामध्ये सावेडी, केडगाव व बोल्हेगाव या ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा आरक्षित केली आहे. तरी मनपा संपूर्ण शहराचा कचरा बुरुडगाव ग्रामस्थांच्या माथी मारत आहे. मनपाने येथील कचरा डेपो तात्काळ बंद करावा.

प्रदूषणामुळे त्रस्त…

येथील कचरा डेपोमुळे बुरुडगाव ग्रामस्थांचे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. संपूर्ण परिसरातील पाणी दूषित झाले आहे. प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांकडून एकमताने मंजूर झालेला ठराव स्वीकारून बुरुडगाव हद्दीतील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या