कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या सिन्नरच्या उडाण फाऊंडेशनच्या ( Udan Foundation- Sinnar ) पदाधिकार्‍यांनी कळसूबाई शिखरावरती पायथ्यापासून तर शिखरापर्यंत 25 कचरा बॅग कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छताविषयी सहा फलक लावण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा कळसूबाई शिखरावरती ( Kalsubai mountain) नवरात्रोत्सवाच्या काळात एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येतात.

तसेच वर्षभर मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक कळसूबाई शिखर सर करण्यासाठी येतात. पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. याचकाळात लोकांकडून प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेस्टर्न, पाण्याचा बाटल्या आदींचा वापर केला जातो. त्यामुळे शिखरावर कचरा निर्माण होतो उपक्रमात उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे, गणेश तांबोळी, महेश जगताप, सत्यजित कळवणकर, योगेश शिंदे, लखन वाघ जयेश पेढेकर, बारी गावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मोहिमेला हातभार लावणार्‍यांचा सन्मान

उडान फाऊंडेशनच्या वतीने कळसूबाईच्या शिखरावर ठिकठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी बॅगा लावण्यात आल्या आहेत. कचर्‍याने भरलेल्या बॅगा पायथ्याशी असलेल्या बारी ग्रामपंचायतीच्या संकलन केंद्रात जमा करणार्‍या भाविकांना उडाण फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *