Friday, April 26, 2024
Homeनाशिकखबरदार..! सिगारेट फुकुन, दारू पिऊन बाटल्या नदीत फेकाल तर..

खबरदार..! सिगारेट फुकुन, दारू पिऊन बाटल्या नदीत फेकाल तर..

नाशिक । Nashik

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्लागर्सच्या महिलांकडून सकाळी शहरातील बापू ते आंनदवल्ली स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेला चंद्रकिशोर पाटील, मयुरी धुमाळ, रोशन केदार यांसह इतरही स्वयंसेवक उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान गोदावरी प्रकट दिनापासून सुरु झालेली हि स्वच्छता मोहिम पुढील वर्षभर असणारआहे. बापू पूल ते आनंदवल्ली हा परिसर मुख्यत्वे स्वच्छतेसाठी ठरविण्यात आला आहे. आठवड्यातील दोन दिवस या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. तर वृक्षारोपणही केले जात आहे.

तसेच शहरातील महाविद्यालयात याबाबतचे सेमिनार गेघेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. यातून नाशिक करांसह विदयार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या