Friday, April 26, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात खळबळ! बारावीचा गणिताचा पेपर फुटला?

नगर जिल्ह्यात खळबळ! बारावीचा गणिताचा पेपर फुटला?

श्रीगोंदा | Shrigonda

तालुक्यासह संपूर्ण राज्यात बारावीच्या (HSC Exam) ऑफलाईन परीक्षा (Offline exam) सुरु असताना बारावीचा गणिताचा (mathematics paper leak) पेपर फुटल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात पसरल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास आधी प्रश्नपत्रिका उत्तरांसह मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. पेपर तोच असल्याने प्रशासनाने ही पेपर नेमका फुटला कसा आणि तो श्रीगोंदयात परीक्षेपूर्वी बाहेर आला का याबाबत कानावर हात ठेवले आहे. गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी परीक्षा झाली नाही. यावर्षी ती ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाची पेपर होता. मात्र तत्पूर्वीच सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. अर्थात त्याचे उगमस्थान श्रीगोंदे की दुसरे कुठे हे समजण्यास मार्ग नसला तरी गणिताचा पेपर फुटला हे वास्तव नाकारता येत नाही.

श्रीगोंद्यात सोशल मीडियावर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे. याबाबत श्रीगोंद्यातील बारावीच्या परीक्षेची माहिती घेतली असता श्रीगोंद्यात नियमानुसार दरवर्षी सहा परीक्षा केंद्र असतात परंतु आता करोना पार्श्वभूमीवर यांची संख्या वाढून १७ ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या