Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिटी बस पिकअप शेड टवाळखोर व जुगार्‍यांचे अड्डे

सिटी बस पिकअप शेड टवाळखोर व जुगार्‍यांचे अड्डे

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घेतली. नंतर शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले. याशिवाय प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव व्हावा यासाठी पीपीपीच्या माध्यमातून ९०० पिकअपशेड उभारण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत झालेले पीकअप शेडची देखाभाल दुरुस्ती व त्यांंची निगा न राखल्याने सिटी बसची पिकअप शेड टवाळखोर व जुगाऱ्यांचे अड्डे बनत चालले आहेत.

- Advertisement -

देखभाल दुरुस्तीअभावी अनेक शेडच्या छताच्या साइडचे पत्रे गायब आहेत, काही ठिकाणी बसण्यासाठीचे बाकही मोडली आहेत. सिटी लिंकने नव्याने उभारलेल्या शेडचे पत्रेही गायब करण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी प्रवाशांना या शेडमध्ये थांबण्याऐवजी रस्त्यावर उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

इंदिरानगर, सिडको, अंबड परिसरातील काही पिकअप शेडमध्ये तर सायकल दुरुस्ती तसेच, चप्पल शिवणाऱ्यांनी दुकानेही थाटली आहेत. शहरातील अनेक पिकअप शेडचे पत्रे, लोखंडी बाकडे चोरांनी उखडून नेले आहेत. त्यामुळे प्रशासनाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पिकअप शेडमध्ये प्रवाशांऐवजी गर्दुल्ले, भिकारी यांचेच वास्तव्य दिसून येत आहे. दुरवस्थेमुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, अशा शेडमध्ये परिसरातील टवाळखोर सर्रासपणे जुगार खेळताना आढळतात. रात्रीच्या वेळी या शेडमध्ये मद्याच्या पार्ट्याही रंगत असल्याचे वृत्त आहे. कोट्यवधी रुपयांच्या या पिकअप शेडकडे लक्ष घालून तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करावी. अशी मागणी प्रवाशांकडुन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या