आठ महिन्यांनी चित्रपटाचा पडदा उघडणार

मुंबई

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात चित्रपटगृहे बंद होती. पण आता राज्यातील चित्रपटगृहे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे थिएटर मालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. याकाळात अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले होते. आता राज्यात ६ नोव्हेंबरपासून चित्रपटांचे नियमित शोज सुरु करण्यात येणार आहेत. चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

काय असेल नियमावली

चित्रपटगृहात केवळ ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे.

चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.

प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात यावे.

आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला प्रेक्षकांना देण्यात यावा.

थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे.

फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा