Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिडको प्रशासक ठाकूर करोना बाधित

सिडको प्रशासक ठाकूर करोना बाधित

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नासिक सिडकोचे प्रशासक घनश्याम ठाकूर करोना बाधीत असल्याने होम कॉरंटाईन झाले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची कामे अडून राहू नयेत यासाठी प्रशासक ठाकूर यांनी प्रशासकीय कामांची जबाबदारी कार्यालयीन सहाय्यक उत्तम साबळे यांच्याकडे दिली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात त्यांनी कार्यालयीन आदेश काढला असून त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात कार्यालयीन कामकाज करताना सिडको नासिक प्रकल्पाच्या बँक ना हरकत दाखला, बँक तारण, बांधकाम ना हरकत दाखला, भोगवटा ना हरकत दाखला आदी सर्वसाधारण कागदपत्रांचा निपटारा करण्याचे अधिकार उत्तम साबळे यांना दिले आहेत.

मात्र संबंधित कागदपत्रांच्या कार्यालयीन प्रती इमेल करून त्यांना मंजुरी घेणे बंधनकारक केले आहे.

त्याचप्रमाणे सिडको नासिक प्रकल्पाच्या सर्व हस्तांतरण ना हरकत दाखला संबंधितांना देताना त्यांची इमेलद्वारे मंजुरी घेऊन ती साबळे यांनी स्वाक्षांकित करून संबंधितांना अदा करण्याचे आदेशही काढण्यात आले आहेत.

यामुळे सामान्य नागरिकांची कामे अडून रहाणार नाहीत किंवा त्यांना विलंब होणार नाही, यासाठीच निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयाची प्रत सिडकोच्या मुख्य प्रशासक सिडको (नवीन शहरे) नविन औरंगाबाद यांना पाठविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या