Chinchwad bypoll : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, राहुल कलाटेंची माघार नाहीच

jalgaon-digital
1 Min Read

पुणे | Pune

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यात मुख्य लढत आहे. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवडमध्ये आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते सचिन अहिर शुक्रवारी राहुल कलाटे यांच्या भेटीला आले होते. यावेळी राहुल कलाटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील त्यांची फोनवरून चर्चा केली.

मात्र, त्यांनंतर ही राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत होणार आहे. मात्र राहुल कलाटे यांचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना बसण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *