Thursday, April 25, 2024
Homeजळगावचिंचोल, मेहूण नि:शब्द

चिंचोल, मेहूण नि:शब्द

जळगाव । देशदूत चमुकडून

लग्नाच्या स्वागत समारंभावरुन परत येते असताना डंपरने धडक दिल्याने क्रुझरचा रविवारी (दि.2) मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या 12 वर गेली आहे. यात वधूचे आई-वडील, भाऊ, आत्याचा समावेश आहे. अपघातात चार जण जखमी आहे. ही घटना फैजपूर-यावल रोडवर रावेर हिंगोणा गावाजवळ घडली. या अपघातामुळे लग्नाच्या आनंदात असलेल्या चौधरी कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

- Advertisement -

तालुक्यातील ऐनपूर येथील मूळ रहिवासी प्रतीक (हल्ली मुक्काम चोपडा) यांचा विवाह मुक्ताईनगर तालुक्यातील प्रभाकर चौधरी यांची मुलगी मंजुश्री हिच्याशी 30 जानेवारी रोजी झाला. या विवाहाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम चोपडा येथे 2 फेब्रुवारी रोजी झाला. परतीच्या प्रवासात निघालेल्या नातेवाईकांच्या गाडीला डंपरने धडक दिली. या अपघातात वधू पिता प्रभाकर उर्फ बाळू चौधरी, आई प्रभाबाई चौधरी, भाऊ शिवम, आत्या सुमनबाई श्रीराम पाटील, मंगलबाई चौधरी, चुलत बहीण संगीता पाटील, सोनाली महाजन यांच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला.

अपघातातील डंपर हा दीपनगर जवळील वेल्हाळे येथून वीटभट्टीसाठी राख घेऊन यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे निघाला होता. क्रुझरमध्ये बसलेल्या मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी वय 65 या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर चौधरी, महाजन, पाटील कुटुंबीयांसह क्रुझरचालक धनराज गंभीर कोळी गंभीर जखमी झाले होते. यातील जखमींना भुसावळ व जळगाव येथे नेत असताना 10 जणांचा मृत्यू झाला. 6 जखमींपैकी दोघांचा औषधोपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. डंपर डांभुर्णी येथील आहे. डंपरचालक मुकुंदा गणेश भंगाळे (वय 26) घटनास्थळापासून पळ काढून फैजपूर पोलिस स्टेशनला हजर झाले.

हा अपघात एवढा भीषण होता की, क्रुझरमधील चौधरी, महाजन, पाटील कुटुंबीय एकमेकांमध्ये अडकलेली होती. ट्रॅक्टर व ट्रकच्या मदतीने क्रेसिंग बांधून चालकास व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना भुसावळ-जळगाव येथील खासगी हॉस्पिटल, गोदावरी हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय यावल येथे दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सर्वेश नितीन चौधरी (वय 9), मीना प्रफुल्ल चौधरी (वय 30), सुनीता राजाराम पाटील (वय 45), अदिती मुकेश पाटील (वय 14) यांचा जबर जखमींमध्ये सामावेश असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. याबाबत फैजपूर पोलिस स्टेशनला हिंगोणा पोलीसपाटील दिनेश जगन्नाथ बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपरचालक मुकुंदा गणेश भंगाळे यास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, ए.पी.आय.प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.रोहिदास ठोमरे तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या