Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशचिन्यांच्या उलट्या बोंबा ; म्हणे भारताकडूनच घुसखोरी

चिन्यांच्या उलट्या बोंबा ; म्हणे भारताकडूनच घुसखोरी

नवी दिल्ली | New Delhi –

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न असफल झाल्यानंतर तिळपापड झालेल्या विश्‍वासघातकी

- Advertisement -

चीनने भारतीय जवानांवरच घुसखोरीचा आरोप केला आहे. भारतीय सैनिकांनी 31 ऑगस्टला सीमेवरील आपल्या हद्दीत अतिक्रमण केले, असा आरोप भारतातील चीनच्या दूतावासाने केला. China accused the Indian Army of crossing the Line of Actual Control (LAC)

पूर्व लडाखमध्ये पेंगाँग त्सो सरोवराजवळ झालेल्या सैनिकी हालचालींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रॉन्ग यांनी हा आरोप केला. 31 ऑगस्टला भारतीय जवानांनी दोन्ही देशांमधील चर्चेत झालेल्या सहमतीचे उल्लंघन करून पेंगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणी भागात आणि रेकिन पासजवळील सीमेवर अतिक्रमण केले, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय जवानांनी अतिकमण केल्यानंतर आमच्या सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीमाभागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला आव्हान दिले असून, यामुळे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

आमचे सैनिक शांतताप्रिय

बीजिंग – सलग तीन वेळा झालेल्या नाचक्कीनंतर चीनने आता सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये चीनकडून पाच वक्तव्ये जारी करण्यात आली. यातील दोन चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून, एक चिनी लष्कराकडून, एक चीन सरकारच्या वृत्तपत्राकडून आणि एक वक्तव्य भारतातील चिनी दूतावासाकडून जारी करण्यात आले आहे.

पहिली प्रतिकिया चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन म्हणाले, चीनचे सैनिक कायमच शांतता कराराचे पालन करतात. त्यांनी कधीच सीमा ओलांडली नाही. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, भारतीय जवानांनी दोन्ही देशांमधील चर्चेत सहमती झालेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. सोमवारी भारतीय सैन्याने जाणूनबुजून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली. भारताची ही कृती चीनला उकसावण्यासाठी होती. चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी म्हटले, भारत आणि चीन दरम्यान सीमा निश्चित झाली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत राहणार. दोन्ही देशांचे नेतृत्व सहमतीने घेतलेले निर्णय लागू करण्याबाबत आणि मतभेदांचे रूपांतर वादात होईल, असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्यात येत आहे. तर, भारतीय जवानांनी 31 ऑगस्टला आमच्या भूभागावर अतिकमण केल्याचा आरोप भारतातील चीनच्या दूतावासाने केला. यामुळे सीमाभागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला आव्हान दिले असल्याचे दूतावासाने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या