Friday, April 26, 2024
Homeनगरचायना मांज्याने गळा कापल्याने तरूण जखमी

चायना मांज्याने गळा कापल्याने तरूण जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील बालिकाश्रम रोडने दुचाकीवर जाणार्‍या तरुणाचा गळा नायलॉन मांजाने कापला.

- Advertisement -

धिरसिंग कल्याण सिंग राजपूत असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी धिरसिंग यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पर्यावरणाला घातक असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आहे. तरी देखील त्याची शहरात खुलेआम विक्री होत आहे. पोलिसांसह, वन विभागाने शहरातील मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली.

तरी देखील मांजाची विक्री सुरू असून दुचाकीवर प्रवास करणार्‍यांना याचा धोका आहे. धिरसिंग बुधवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून बालिकाश्रमरोडने जात असताना अचानक एक मांजा त्यांच्या गळ्याला गुंतला. यामुळे धिरसिंग यांचा गळा कापून ते जखमी झाले.

स्थानिकांच्या मदतीने धिरसिंग यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण सुरसे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने सायंकाळी पतंग उडविणार्‍यावर कारवाई सुरू केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या