Thursday, April 25, 2024
Homeजळगावचिमठाणे येथे करोनाचा संसर्ग

चिमठाणे येथे करोनाचा संसर्ग

चिमठाणे – Chimthane – वार्ताहर :

तालुक्यातील चिमठाणे येथे करोनाचे 14 रुग्ण आढळून आले. त्यामुळेे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी चिमठाणे कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे.

- Advertisement -

तर 11 ते 16 मार्च दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावशक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद राहतील.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन घोषित झाल्यानंतर तहसिलदार सुनील सैंदाणे यांनी चिमठाणे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व पाहणी केली.

करोना बाबतचे सर्व नियम पाळण्याचे जनतेला आवाहन केले. त्यावेळी विस्तार अधिकारी भीमराव गरुड, मंडळ अधिकारी पंडित दावळे, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, तलाठी जगदीश निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, सरपंच खंडू भिल, योगेंद्रसिंग गिरासे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या