Thursday, May 2, 2024
Homeनगरलहान मुलांना पळविणार्‍या भामट्यास ग्रामस्थांनी पकडले

लहान मुलांना पळविणार्‍या भामट्यास ग्रामस्थांनी पकडले

टाकळीभान |वार्ताहर|Takalibhan

श्रीरामपूर (Shrirampur) तालूक्यातील टाकळीभान येथे लहान मुलांना पळवून नेणार्‍या एकास टाकळीभान ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. या घटनेमुळे टाकळीभान (Takalibhan) येथे खळबळ उडाली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

एसटी बस-स्कार्पिओची समोरासमोर धडक

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, गुरूवार दि. 16 मार्च रोजी दुपारी दिड वाजेच्या दरम्यान येथील वार्ड क्रमांक 3 खळवाडी परिसरातील रामेश्वर शिंदे यांची 7 वर्षाची इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी मुलगी कांचन रामेश्वर शिंदे ही घराबाहेर खेळत असताना या मुलीस अनिल पोपट निकम (वय 23, रा. बाजाठाण ता. वैजापूर. जि. छ. संभाजीनगर) याने पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता या मुलीने आरडाओरड केल्याने मुलीची आई घराबाहेर आली. तिने भामट्याला पकडले मात्र हाताला झटका देवून भामटा पळून गेला.

अरणगाव दुमाला दरोड्यानंतर काही अंतरावरच पुन्हा जबरी चोरी

या घटनेअगोदर त्याने याच परीसरातील स्वरा राकेश येवले या मुलीला (Girl) पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मुलगी घरात पळून गेल्याने त्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने रामेश्वर शिंदे यांच्या मुलीला पळविण्याचा प्रयत्न केला तोही प्रयत्न फसला. पोरं धरणारा गावात आला असून एका मुलीस पळविण्याचा प्रयत्न झाला यासह या भामट्याचे वर्णन सोशल मिडीयावर टाकण्यात आल्याने नागरिक सतर्क झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी या भामट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर त्याला भोकर येथील जगतापवस्ती परिसरात पकडून चोप दिला असता त्याने त्याचे नाव, गाव सांगितले.

नगरमध्ये ‘त्या’ तरुणाचा मृत्यू इन्फ्लूएंझा आणि करोनामुळे

या भामट्याला ग्रामस्थ सचिन नागले, किरण मेहेत्रे, सुनिल येवले, गणेश शिंदे, गजानन सावंत, लाला मैड, रमेश पेहरकर, विवेक शिंदे यांनी पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे टाकळीभान येथे खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

इतिहासात प्रथमच साई संस्थानच्या तिजोरीच्या चाव्या महिलेकडे

- Advertisment -

ताज्या बातम्या