Friday, April 26, 2024
Homeनाशिकआता सीईओ साधणार सरपंचांशी थेट व्हॉट्सअप द्वारे संवाद

आता सीईओ साधणार सरपंचांशी थेट व्हॉट्सअप द्वारे संवाद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेले निर्णय, योजनांंची माहिती प्रत्येक सरपंचांपर्यंत थेट पोचविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सरपंंचांशी थेट संवाद व्हावा म्हणुन व्हॉट्सपद्वारे कनेक्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एक हजार ३८८ सरपंचांचे व्हॉट्सप ग्रुप तयार केले जाणार आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वांत वरचा टप्पा असलेलीला जिल्हा परिषद आणि शेवटचा घटक असलेली ग्रामपंचायत यामध्ये संवादाचा सेतू भक्कम असणे आवश्यक असल्यामुळे विकासाबाबत काहीही महत्त्वाचे निर्णय, अंमलबजावणी किंवा ग्रामस्तरावर असलेल्या सर्व बाबी एकमेकांकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे.

त्यासाठी कार्यालयातील पत्रव्यवहार होत असतातच. मात्र या लालफितीमुळे कधी कधी उशीर होण्याची शक्यता असते. त्यास छेद देण्याचा निर्णय श्रीमती मित्तल यांनी घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरपंचांमध्ये थेट संवाद होण्यासाठी व्हॉट्सपचा वापर केला जाणार आहे.यात तालुकानिहाय सरपंचांचे व्हॉट्सप ग्रुप तयार केले जाणार आहेत. प्रशासनाने घेतलेले निर्णय, उपक्रम तत्काळ सरपंचांपर्यंत पोचविले जातील. यातून सर्व प्रशासन गतिमान होण्यास मदत मिळेल. गावपातळीवर योजना, उपक्रम पोचण्यास मदत होईल, असे मित्तल यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या