Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआंतरराष्ट्रीय शांतता दिवसानिमित्त ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

आंतरराष्ट्रीय शांतता दिवसानिमित्त ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२१ सप्टेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस (international peace day) साजरा केला जातो. या प्रसंगी अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स येथे भारत व रशियाच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे (Online chess tournament) आयोजन करण्यात आले होते…

- Advertisement -

यात भारतातर्फे एकूण 32 विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर रशियातील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता.

भारतातर्फे अशोका ग्रुप ऑफ स्कूल अर्जुन नगरच्या उपप्राचार्य डॉ. प्रिया डिसूजा व अशोका ग्रुप ऑफ स्कूल अशोका मार्गचे रविराज पंचाक्षरी यांनी स्वागतपर भाषण केले तसेच रशियातर्फे एन ए सिडोरेंको मास्को मधील पहिल्या डिप्लोमॅटिक कॅडेट स्कूलचे प्रमुख यांनी स्वागतपर भाषण केले.

या स्पर्धेत स्वीस लीगच्या धर्तीवर एकूण सहा बुद्धिबळाचे डाव खेळण्यात आले. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरवण्यात आली होती. त्याचबरोबर झूमवरदेखील प्रसारित करण्यात आली.

मुलांमधील पहिले पाच विजेते पुढील प्रमाणे सोहम लुनावत (अशोका ग्रुप ऑफ स्कूल अर्जुन नगर), आयुष मंत्री (अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स अर्जुन नगर), फेडेयानेव मातवे (रशिया), पुष्कर मस्के (अशोका ग्रुप ऑफ स्कूल अशोका मार्ग), आणि कॉन्स्टंट टाइन (रशिया) यांचा समावेश होता तसेच पहिल्या पाच विद्यार्थिनींमध्ये सानवी येवलेकर (अशोका ग्रुप ऑफ स्कूल अशोका मार्ग),नेफेडोवा विक्टोरिया ओलेगोनवा ( रशिया), गाथा लोढा (अशोका ग्रुप ऑफ स्कूल अशोका मार्ग), चेरेनशवा वेरोनिका (रशिया) आणि गार्गी येवलेकर (अशोका ग्रुप ऑफ अशोका मार्ग) यांचा समावेश होता.

यावेळी अशोका ग्रुप ऑफ स्कूलचे ऍक्टिव्हिटी व एजियम स्पोर्ट्स प्रमुख व भारताचे ASIP व SPIA चे सचिव डॉक्टर दिनेश सबनीस यांनी तसेच रशियातर्फे तांगका (मॉस्को) येथील पीस बिल्डर या विज्ञान तंत्रज्ञान केंद्राचे प्रशिक्षक यांनी आभार मानले.

अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या एआयएसपी एसपीआय हेडक्वार्टर भारतातर्फे तसेच रशियाच्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता विभागातर्फे नाशिक जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन डॉक्टर दिनेश सबनीस यांनी अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या सर्व शैक्षणिक व व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या