Saturday, April 27, 2024
Homeनाशिक'या' तारखेपासून ‘सीईटी’च्या परीक्षांना सुरवात

‘या’ तारखेपासून ‘सीईटी’च्या परीक्षांना सुरवात

नाशिक | Nashik

एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने अखेर जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

सीईटीच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे सुमारे सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती व प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना सीईटीच्या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, आैषधनिर्माण शास्त्र, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यंदा कराेनाच्या वाढत्या संकटामुळे जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व अन्य माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदा परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत.

परीक्षा दोन टप्प्यांत

सीईटीच्या परीक्षा १ ते २० ऑक्टोबर या काळात दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) या ग्रुपच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) या ग्रुपमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.

या आहेत तारखा

पीसीबी ग्रुपची परीक्षा १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना, तर पीसीएम ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.

विविध १३ सीईटींसाठी राज्यातून सहा लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी सर्वाधिक पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंद केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या