Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'या' राज्यात होणार जातीनिहाय जनगणना; सर्वपक्षीय बैठकीत ठराव मंजूर

‘या’ राज्यात होणार जातीनिहाय जनगणना; सर्वपक्षीय बैठकीत ठराव मंजूर

दिल्ली (Delhi)

बिहारमध्ये (Bihar) जातीनिहाय जनगणना (Caste-based census) करण्याचा मार्ग मोकळा झाला. जातनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी वेळेची मर्यादा घातली जाणार आहे. सर्व पक्षांनी एकमताने या निर्णयास पाठिंबा दिला.

सर्वपक्षीय बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ‘केंद्र सरकाने देशव्यापी जातीनिहाय जनगणनेसाठी परवानगी दिली नाही म्हणून राज्याने जाती निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.’

तसेच ‘राज्यातील नऊ राजकीय पक्षांनी जात जनगणनेचा निर्णय घेतला आहे. यासाठी कबिनेटमध्ये लवकरच परवानगी मिळेल आणि त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचं’ मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या