Friday, April 26, 2024
Homeक्रीडाBy-Election : कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा पोट निवडणुकीत पराभव

By-Election : कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा पोट निवडणुकीत पराभव

दिल्ली | Delhi

बिहार निवडणुकांबरोबरच देशभरात विविध ठिकाणी काही पोटनिवडणुकांचे निकाल देखील लागत आहेत. देशातील ११ राज्यांमधील ५८ विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

यातच हरियाणामधील बरोडा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमधून योगेश्वर दत्त भाजपा उमेदवार म्हणून राजकीय आखाड्यात उतरला होता. मात्र त्याचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला आहे.

हरियाणामधील बरोडा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेस उमेदवार इंदुराज नरवाल यांना ६० हजार १३२ मते मिळाली. तर भाजपा उमेदवार योगेश्वर दत्त याला ५० हजार १७६ मते मिळाली. इंडियन नॅशनल लोकदलच्या उमेदवाराला ४ हजार ९८० मते आणि लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला ५ हजार ५९५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला सुमारे १० हजार मतांनी विजय मिळाला. बरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे योगेश्वर दत्त, काँग्रेसचे इंदुराज नरवाल. इनेलोचे जोगेंद्र मलिक, लोसुपाचे राजकुमार सैनी यांच्यासह १४ जण रिंगणात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या