Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआगीत वीस एकर ऊस जळून खाक

आगीत वीस एकर ऊस जळून खाक

निफाड। प्रतिनिधी Niphad

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत Fire गोदाकाठच्या शिंगवे शिवारात Shingve Shivar सुमारे 20 एकर ऊस Sugarcane जळून खाक झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तोडणीला आलेला ऊस जळाल्यामुळे महावितरण Mahavitaran कंपनीने या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान सायखेडा मंडळ अधिकारी कारवाल, शिंगवे तलाठी प्रसाद देशमुख यांनी घटनास्थळाची पहाणी करून पंचनामा केला आहे.

- Advertisement -

तालुक्याच्या गोदाकाठ भागात सर्वाधिक क्षेत्रावर ऊसाचे पीक उभे आहे. तालुक्यातील दोन कारखाने बंद असल्याने व एक कारखाना यावर्षी चालू झाल्याने ऊस तोडून देण्यासाठी शेतकर्‍यांंना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरात अद्यापही तोडणीअभावी मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. अशातच आता शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. लोंबकाळणार्‍या तारा, वाकलेले पोल आणि नादुरूस्त ट्रान्सफार्मर यांची दुरूस्ती महावितरणकडून केली जात नसल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

शिंगवे येथे देवाचा मळा परिसरात आठ ते दहा शेतकर्‍यांचा अंदाजे 20 एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथीलच भाऊलाल कोरडे यांच्या उसावरून गेलेल्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होवून आगीचे लोळ ऊसात पडल्याने त्यांच्या उभ्या उसाने पेट घेतला. याचवेळी परिसरात वार्‍याचा वेगही जास्त असल्याने अल्पावधीतच ही आग वेगाने पसरली. त्यामुळे या संपूर्ण शिवारात आगीचे लोळ उठले.

सायंकाळच्या वेळी अंधार असल्याने आगीचे रौद्र रूप 4 कि.मी. अंतरावरून दिसत होते. येथील महेश कोरडे, दत्तू कोरडे, रोहिदास कोरडे, अशोक कोरडे, कृष्णा कोरडे, सचिन कोरडे आदींसह अनेक शेतकर्‍यांचा ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शेतकर्‍यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आजूबाजूचे ऊस वाचविण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुमारे 20 एकर ऊस जळून खाक झाला.

वर्षभर जीव लावून व मोठा खर्च करीत वाढवलेला ऊस डोळ्यादेखत जळतांना पाहण्याचे दुर्भाग्य शेतकर्‍यांनी अनुभवले. सुमारे चार तास या परिसरात ऊसाचे क्षेत्र जळत होते. रात्री 10 वाजेनंतरच ही आग आटोक्यात आणण्यात परिसरातील शेतकर्‍यांना यश आले. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात तोडणीअभावी ऊस शिल्लक आहे. आता ऊसतोडणी पूर्वीच आगीच्या घटना घडू लागल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. त्या उसाचे योग्य ते पंचनामे होवून शासनासह कंपनीने देखील या शेतकर्‍यांना योग्य ती नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

हिस्त्र श्वापदांसह वीजप्रश्न गंभीर

गोदाकाठ परिसरात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक असून याच परिसरात बिबटे, तरस, कोल्हे आदींसह हिस्त्र श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विजवितरणचे वाकलेले पोल, लोंबकाळणार्‍या तारा यासह वीज साहित्याची झालेली दुरवस्था यामुळे वीजपुरवठा खंडीत होणे, वीजतारा तुटणे, ट्रान्सफार्मर जळणे असे प्रकार वाढले आहे. त्यातच आता वाढत्या वीजभारनियमनामुळे शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी द्यावे लागते. विजवितरण कंपनीच्या नादुरूस्त साहित्यामुळे वीजतारांचे घर्षण होऊन ऊस जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या हिस्त्र श्वापदापासून बचाव करण्याची कसरत शेतकर्‍याला करावी लागत असतांना आता वीजेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. प्रशासनाने वेळीच वीज उपकरणांची दुरूस्ती करावी.

धोंडीराम रायते, उपसरपंच (शिंगवे)

- Advertisment -

ताज्या बातम्या