Wednesday, May 8, 2024
Homeनगरसोनईत दोन घरफोड्या; साडेसहा तोळ्यांचे दागिने लंपास

सोनईत दोन घरफोड्या; साडेसहा तोळ्यांचे दागिने लंपास

सोनई |वार्ताहर| Sonai

जुना वांबोरी रस्त्यावर (Old Vambori Road) असलेल्या दत्तनगर परिसरात (Datta Nagar Place) पाच ते सात चोरट्यांनी दोन घरफोड्या (Burglary) करून रोख रक्कम व साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला. कर्डिले (Kardile) यांच्या घरातून साडेतीन तोळे सोन्याचे तर दिपक जाधव यांच्या घरातून तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांचा तिसर्‍या घरफोडीचा (Burglary) प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

- Advertisement -

दत्तनगर भागात राहत असलेल्या संतोष कर्डिले यांचे घर उसाच्या शेताजवळ असल्याचा फायदा घेवून सहा ते सात अज्ञात चोरट्यांनी तारकुंपण व तेथील कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.तीन चोरटे घरात घुसले. तर अन्य चोरटे अंगणात उभे होते. त्यांच्या हातात कोयता, लोखंडी गज व कमरेला तलवारी होत्या.

शस्राचा धाक दाखवून चोरट्यांनी अंदाजे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. लहान मुले व महिलांच्या कान व नाकातील दागिने छोट्या कटरने तोडून पायातील चांदीचे जोडवेही नेले.

येथून शेजारीच राहत असलेल्या गायकवाड यांच्या घरी चोरटे गेले मात्र तेथे काहीच हाताला लागले नाही. शेजारच्या दीपक जाधव यांच्या गच्चीवरील दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन तोळे दागिने व तीन हजार रुपये चोरून नेले.चोरट्यांनी जवळच्या सर्व घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. रविवारच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजता तिन्ही घटना झाल्या. अण्णासाहेब दरंदले यांची खिडकी तोडून चोरीचा प्रयत्न झाला मात्र सर्व उठल्यानंतर चोरटे पळाले. दरंदले यांनी लगेच पोलिसांना खबर दिली. पोलीस वाहन तीन वाजता आले. तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

फिर्याद दाखल होण्यास उशीर

चोरीची फिर्याद देण्यासाठी कर्डिले व जाधव सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पोलीस ठाण्यात आले. मात्र तब्बल साडेतीन तास उलटूनही फिर्याद दाखल झाली नव्हती. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी इंटरनेट प्रॉब्लेममुळे फिर्याद घेण्यास उशिर झाल्याचे स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या