पळा पळा म्हैस आली…मेनरोडवर अचानक आलेल्या म्हशीने केले चौघींना जखमी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

आपले काहीच नसताना दुसर्‍याच्या गोष्टींमध्ये विनाकारण लुडबुड करणारांसाठी ‘कोणाची म्हैस.. आणि कोणाला उठबैस’ ही म्हण वापरली जाते. मात्र ही म्हण नाशकात तंतोतंत घडल्याचे समोर आले आहे. अचाकन गोंधळलेली मारकी एक म्हैस सायंकाळी ऐन बाजाराच्या गर्दीत मेनरोडवर आली. तीने ढुसण्या मारत 6 जणांना जखमी केले यामुळे काही काळ गोंधळ उडाला, धापळ करत तिघांनी ती म्हैस पकडून नेली आणि यानंतर मात्र ती गायब झाल्याने दुसरा गोंधळ उडाल्याचा प्रकार दुपारी घडला…

नाशिक शहरात बिबट्या येणे ही बाब नाशिककरांच्या अंगवळणी पडली आहे. पुणे तसेच मुंबई परिसरात रानगवे शहरात आल्याने गोंधळ उडाला होता. मात्र नाशिक शहरात मुख्य बाजार पेठेत घुसलेल्या म्हशीने गोंधळ उडवून दिला.

बाजार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मेनरोडवर भद्रकालीच्या बाजुने उधळतच एक मारकी म्हैस बाजारात घुसली. ती सरळ रविवार कारंजाच्या दिशेने उधळत निघाली. नागरीकांची गर्दी पाहुण ती गोधंळली. तीने समोर येणार्‍यांना ढुसण्या मारण्यास सुरूवात केली.

यामध्ये दोन वृद्ध महिला जखमी झाल्या, एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात तीने एका युवतीला जखमी केले. तर एका कापड दुकानात घुसण्याचा प्रयत्नात तेथील काचेचे कपाट फुटले. यानंतर तीघांना तीने धडक दिली. किरकोळ जखमी झालेल्यांनी तेथून पळ काढला. तर दुकानदार व्यावसायीकांनी तीला हुसकण्याचा प्रयत्न केला. यानंतर धावत पळत आलेल्या तिघांनी धुमाळपॉइंट परिरात तीला पकडून पुन्हा भद्रकालीच्या दिशेने नेले.

त्यांनी भद्रकाली परिसरातील एका मोठ्या व्यक्तीच्या ताब्यात म्हैस दिली. सबंधीत व्यक्तीने म्हैस एका पिकअप गाडीला बांधली. यानंतर काही वेळात पिकअप तसेच म्हैस गायब झाले. या म्हशीचा मुळ मालकाचा तपासही नव्हता.

दरम्यान ही म्हैस सबंधीत व्यक्तीने कत्त्तलखान्यात नेल्याचा आरोप एका गटाच्या कार्यकर्त्याने केला. यावरून भद्रकाली पोलीस ठाण्यात सबंधीतांमध्ये वादावाद झाली. परंतु म्हैस कुठे गायब झाली व तीचा मुळ मालक कोण याचा शोध भद्रकाली पोलीस घेत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *