Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशहरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात

शहरात बुद्ध पौर्णिमा उत्साहात

इंदिरानगर | प्रतिनिधी | Indiranagar

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, भगवान गौतम बुद्धांचा आजच्या तिथीला जन्म झाला याच तिथीला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच तिथीला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. संपूर्ण विश्वाला प्रज्ञा, करुणा मैत्री, प्रेम ,मानवता , समता आणि शांतीची शिकवण देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६७ व्या जयंतीनिमित्त पांडवलेणी स्थित बौद्ध स्मारक येथे बौद्ध भिक्खुकडून त्रिवार वंदन करण्यात आले.

- Advertisement -

सकाळी बुद्ध वंदना, प्रवचन, ज्ञानसाधना व ध्वजारोहण करण्यात आले. शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व नाशिक मनपाकडून आयोजित या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भदंत सुगत, भदंत आर्यनाग, तसेच धमरत्न, धम्मरक्षित व इतर भदतांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तर संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम झी युवाचे चेतन लोखंडे प्रस्तुत भीम गीतांचा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. नवजीवन रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकरोड इथून निघालेल्या द्वारका मार्गे ही रॅली बौद्ध स्तूपात येऊन संध्याकाळी दाखल झाली. भदंत नागधम्मो, भदंत महाथेरो, भदंत अभयारत्न, भदत संघरत्न, धम्मरत्न, भदंत धम्मरक्षित तसेच अध्यक्ष भदंत सुगत सदस्य आर्यनाग उपस्थित होते.

नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे प्रभागाचे नगरसेवक भगवान दोंदे तसेच इतर नगरसेवक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देत बौद्ध स्तूपाचे दर्शन घेतले . या ठिकाणी खीरदान वाटप करण्यात आले.

यावेळी बौध्दपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. दिवसभर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. विविध सेवेकऱ्यांनीही आपली या ठिकाणी सेवा दिली. दरम्यान, प्रभारी पोलीस उपायुक्त अंबादास भुसारे, इंदिरानगर पोलीस स्टेशनचे गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या