Friday, April 26, 2024
Homeजळगावआदेशाची पायमल्ली : दहिगाव-सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र बंद

आदेशाची पायमल्ली : दहिगाव-सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र बंद

यावल – प्रतिनिधी
सर्वत्र कोरोना वायरसची भीतीने ग्रामस्थ भयभीत झालेली असून मात्र सातपुडा पर्वत रांगेत लागून असलेल्या दहिगांव सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व स्टॉप हे शनिवार दिनांक 14 मार्च शनिवार रोजी या ठिकाणी कुलूप लावून ठेवले होते व हजर नव्हते.

याबाबत काँग्रेस पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली आठ वाजून 15 मिनिटांनी शेखर पाटील यांनी आरोग्य केंद्र गाठले व शेवटी कुलूप लावून डीएचओ व वरिष्ठांना याबाबत अवगत केले.

- Advertisement -

या याठिकाणी डॉक्टर नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी, शिपाई दिपाली पाटील, क्लार्क सुट्टी आहे, असिस्टंट कल्पेश पाटील, आरोग्य सहाय्यक भूमिका सोनवणे, आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी व वैशाली चौधरी, उपकेंद्र शोभा जावळे एम पी डब्ल्यू संजू तडवी हे सर्व गैरहजर आढळून आले.

याबाबत शेखर सोपान पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याशी संपर्क साधून सदरची घटना कळवली त्यांनी सर्वांना मी लवकर पाठवतो असे सांगितले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भात सर्वांना दवाखान्यामध्ये उपस्थित राहण्याची सांगितले असल्याने कलेक्टरच्या आदेशाची या ठिकाणी पायमल्ली झालेली दिसते.

याबाबत आपण काय कारवाई करणार? असा सवाल शेखर पाटील यांनी आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला त्यांनी आज शनिवार दिनांक 14 मार्च रोजीचा गैरहजर असलेल्या सर्वांची गैरहजेरी लावतो व यांना कारणे दाखवा नोटीस बजावतो असे आश्वासन दिल्याने शेखर पाटील यांचे समाधान झाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात आता तरी कोणाचे संदर्भात जिकडेतिकडे कोरोनासंदर्भात वाचता सुरू असताना व जिल्हाधिकार्‍यांची हजर राहण्याचे आदेश असताना सर्व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश द्यावेत व त्यांच्यावर कडक नजर ठेवावी अशी मागणी शेखर सोपान पाटील यांनी केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या