Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपंधराशे मजुरांना घेऊन नाशिकरोडहून विशेष रेल्वे रवाना

पंधराशे मजुरांना घेऊन नाशिकरोडहून विशेष रेल्वे रवाना

नाशिकरोड | प्रतिनिधी 

शहर व जिल्हा परिसरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना मध्यप्रदेशात घेऊन जाणारी तिसरी विशेष रेल्वे गाडी आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशकडे रवाना झाली.

- Advertisement -

या रेल्वेगाडीत सुमारे पंधराशे परप्रांतीय मधून होते. खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सदरची रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. यापूर्वी एक व दोन मे रोजी एमपी व यूपीमधील प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने गाडी सोडली होती.

आता पुन्हा परप्रांतीय मजुरांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. तत्पूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात कडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी सीलबंद केले होते. परप्रांतीय मजुरांना खाजगी गाड्यांमधून रेल्वे स्थानकावर चार वाजेपासून वाचण्यात येत होते. तसेच संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या