जळगाव : बाफना ज्वेलर्सतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीस १० लाखाची मदत

जळगाव : बाफना ज्वेलर्सतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीस १० लाखाची मदत

जळगाव | प्रतिनिधी
रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचे संस्थापक तथा संचालक रतनलाल बाफन यांनी देशभरावर असलेल्या कोरोना व्हायरसचे संकट निवारणासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी म्हणून १० लाख रुपयांची मदत पाठवली आहे.

बाफना यांनी या अगोदर कोरोना व्हायरस प्रतिबंधाच्या मोहिमेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून पाच लाख रुपयांची मदत पाठविली आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे ग्रासलेले व भयभीत आहे.

अशा संकट समयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेल्या प्रयत्नांसाठी आर्थिक मदत करणे हे कर्तव्य समजून पुन्हा १० लाख रुपयांची मदत पाठवित आहे, अस रतनलाल बाफना यांनी म्हटले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com