Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे : विद्यार्थिनीचे प्रसूती प्रकरणी ‘त्या’ वसतिगृहाचे गृहपाल निलंबीत

धुळे : विद्यार्थिनीचे प्रसूती प्रकरणी ‘त्या’ वसतिगृहाचे गृहपाल निलंबीत

धुळे – प्रतिनिधी

साक्रीतील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने वस्तीगृहातच स्वतःची प्रसूती केल्यानंतर या प्रकरणी गृहपाल अश्विनी वानखेडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

आदिवासी विकास विभागाचे नाशिक अप्पर आयुक्त यांनी हे आदेश पारित केले आहे.
सक्रीच्या या वसतिगृहात एका अल्पवयीन मुलीने स्वतःची प्रसूती करून अर्भक बादलीत ठेवून पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपली. मात्र बाळाच्या राडण्याच्या आवाजाने या घटनेचे बिंग फुटले.

विशेष म्हणजे दोन च महिन्यांपूर्वी साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या तपासणीत या मुलीचा नील रिपोर्ट देण्यात आला आहे. पण मग ती गर्भवती असल्याचे वसतिगृहाच्या आरोग्य तपासणीत निदर्शनात आले नाही काय? हा प्रश्न उपस्थित होत असताना या संदर्भात कर्तव्यात कसूर केली म्हणून गृहपाल श्रीमती शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या