चाळीसगाव : अत्यावश्यकसेवाच्या नावाखाली रस्त्यावर प्रचंड गर्दी

चाळीसगाव : अत्यावश्यकसेवाच्या नावाखाली रस्त्यावर प्रचंड गर्दी

दुकाने बंदच, बॅक, किराणावर झुंबड

चाळीसगाव | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. तसेच पाच पेक्षा आधिक व्यक्ती जमण्यास बंदी घातली असून गजर असतानाच घराच्या बाहेर पडण्याच्या शासनाचे आदेश आहेत. परंतू चाळीसगावात शासनाच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही.

अत्यावश्यकसेवेच्या नावाखाली शहरातील रोडावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत आहे. तर शहरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने सर्रास दारुची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे चाळीसगाव तरी बर्‍याच लोकांनी अजुनही कोरोनाची अजिबात भिती वाटत नसल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रशासनातर्फे नागरिकांना कळकळचे आवाहन करुनही जर त्यांना समजत नसेल, तर पोलीस प्रशासनाचे आपल्या पध्दतीने नागरिकांना घरात बसविण्याची वेळ आली असून बाहेर फिरणार्‍यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सोमवारी किराण दुकान, भाजीपाल व बॅकावर नागरिकांची एकच गर्दी दिसून आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com