Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ : १५ दिवसात ३७ हजार ७८५ रेल्वे वॅगन्समधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

भुसावळ : १५ दिवसात ३७ हजार ७८५ रेल्वे वॅगन्समधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

भुसावळ

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा या कठीण काळात जीवनावश्यक व आवश्यक वस्तूंच्या वाहतूकी साठी मध्य रेल्वे प्रशासनाची माल वाहतूक दि.२३ मार्च पासून सतत सुरु असून दि.७ एप्रिल पर्यंत विविध ७४४ रॅक्समधून ३७हजार ७८५ वॅगन्समधून मालाची वाहतूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी फक्त मालवाहतूक चालू ठेवली आहे. २४ बाय ७ सतत कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांतील मालवाहतूक धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचार्‍यांनी देशभरात पुरवठ्यासाठी ७४४ रॅक्समध्ये आवश्यक वस्तूंच्या ३७ हजार ७८५ वॅगन लोड करुन वाहतूक केली आहे.

यात कोळसा (२२ हजार ४३४ वॅगन्स), कंटेनर (११ हजार ०९९), पेट्रोलियम उत्पादने (२ हजार ४६५), विविध वस्तू (८१५), खते (३९२), स्टील (१६९), साखर (१६८), डी-ऑईल केक (१२६), सिमेंट (११७) अशा एकूण ३७ हजार ७८५ वॅगन्सचा समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी दि. २३ मार्च ते ७ एप्रिल पर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या.

या वाहतुकीवर वरिष्ठ स्तरावर अधिकार्‍यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य रेल्वेला या काळात जनतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव आहे आणि या प्रयत्नात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने भागधारकांना केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या