जनता कर्फ्यू : शंख, घंटी, थाळीनादने दणाणली शहरे व ग्रामीण भाग

जळगाव/नंदुरबार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. या दिवशी सायंकाळी ठिक ६ वाजता नागरीकांनी खिडकीत, गॅलरीत उभे राहून शंख, घंटी, सायरन, थाळीनाद व टाळी वाजवून आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलीस, नर्स, डॉक्टर, देशाचे सैनिक, पत्रकार, महावितरण व संबंधित सर्व कर्मचारी यांचे धन्यवाद देण्यासाठी ग्रामीण भागासह सर्व शहरांमध्ये पाच वाजताच थाळी नाद, शंख नाद, घंटा नाद एकाचवेळी घुमल्याने वातावरण अत्यंत प्रसन्न व प्रफुल्लीत झाले होते.

हा नात पाच ते दहा मिनीट करायचा होता. मात्र ज्यांनी याबाबतचे नियम, माहिती नसलेल्यांनी फटाके फोडले. असे करणे योग्य नाही कारण आज जीकाही कर्फ्यू पाळण्याची वेळ आली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एवढे करूनही अनेक महाभाग कायद्याचे उल्लंघन करताना अनेकठिकाणी दिसून येत आहेत.

आजचा कर्फ्यू हा ‘जनतेने जनतेसाठी पाळलेला कर्फ्यू’ होता. याची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत होती आता ती मात्र उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत ही वेळ राहणार आहे. एवढेच नाही तर उद्यापासून सकाळी पाच वाजेनंतर ‘जमाव बंदी’ आदेश पारीत केला आहे. या नियमात पाच व्यक्तींपेक्षा अधिक जण एकत्र जमलेले दिसले तर त्यांचेवर पोलीस कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.

राज्यात आज करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढली असल्याने ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे या आजाराला मुळापासून नष्ट करायचे असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला ही आनंददायी बाब आहे. नागरीकांचे असेच सहकार्य यापुढेही लाभावे हीच अपेक्षा.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *