Wednesday, April 24, 2024
Homeजळगावगुजराल पेट्रोलपंप परिसरातून मुलाचे अपहरण

गुजराल पेट्रोलपंप परिसरातून मुलाचे अपहरण

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरात असलेल्या एटीएम जवळून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील जितेंद्र प्रकाश बडगुजर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा गुरुप्रसाद जितेंद्र बडगुजर (वय-14) हा अल्पवयीन मुलगा दि.10 जून रोजी दुपारी 1 वाजता शहरातील गुजरात पेट्रोल पंप नजीकच्या एटीएम समोर उभा असताना अज्ञात व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलाच्या नातेवाईकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही अखेर रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या