Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअग्निशामक गाडीसाठी बोरगावला रास्ता रोको

अग्निशामक गाडीसाठी बोरगावला रास्ता रोको

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यातील बोरगाव (Borgaon) येथे वारंवार घराला आगी लागल्याच्या घटना घडल्याने बोरगाव व परिसरात विविध गावांना अग्निशामक गाडी (Fire Truck) मिळावी यासाठी आज रास्ता रोको करण्यात आला…

- Advertisement -

Nashik Crime : चाळीसगावची हैदर टोळी नाशकात जेरबंद

मागील तीन दिवसात दोन वेळा आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक घर व एक स्वीटचे दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर ती आग विझवण्यासाठी तालुक्यामध्ये एकही अग्निशामक गाडी नसल्यामुळे ही आग एका घराला लागून दुसऱ्या घराला लागत आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी तालुक्यात अग्निशामक गाडी मिळावी यासाठी आज रास्ता रोको (Rasta Roko) करण्यात आला.

Nashik Crime News : १५ हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान, यावेळी सुरगाणा तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या रास्ता रोकोचे नेतृत्व बोरगावचे सरपंच अशोक गवळी ग्रामपंचायत सदस्य संदीप भोये, पुंडलिक भोये, अण्णा भरसट यांनी केले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक भास्कर भोये, काशिराम भोये, लक्ष्मण बागुल, मुरलीधर ठाकरे, यांच्यासह हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

NCP Meeting : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड; प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचे निलंबन

तीन-चार वर्षात बोरगाव गावामध्ये तीन दुकाने व दोन घरे जळून खाक झाले शासनाकडे मदतीचा हात मागितला असता उडवाउडवीचे उत्तरे मिळतात उलट पक्षी आम्हाला गुजरात राज्याकडून कोणतीही अडचण न सांगता मदत मिळत असते आपत्ती व्यावस्थापनात महाराष्ट्र फेल गुजरात पास म्हणण्याची वेळ आली आहे आदिवासी भागात विज रस्ता पाणी आधीच्या सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने आम्हाला गुजरात राज्यामध्ये जोडून द्यावे.

अशोक गवळी, सरपंच, बोरगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या