Friday, May 10, 2024
Homeनाशिकआयमा इंडेक्सची बुकिंग पूर्ण; आज भूमिपूजन

आयमा इंडेक्सची बुकिंग पूर्ण; आज भूमिपूजन

सातपूर । प्रतिनिधी Nashik

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या ( AIMA ) वतीने 18 मार्च ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची बुकिंग ( Stalls Booking For AIMA Index -2022 )फुल्ल झाली असून या प्रदर्शनाचे डोम उभारणीचे भूमिपूजन आज रविवारी (दि.13) नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याचे आयमा इंडेक्सचे ( AIMA Index )चेअरमन धनंजय बेळे यांनी सांगितले.

- Advertisement -

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रासाठी प्रगतीसाठी उपयोगी ठरणार आहे. विविध देशातील कॉन्स्यूलेट कार्यालय, प्रतिनिधी व त्यांचे शिष्टमंडळही औद्योगिक विकासासाठी या प्रदर्शनाला भेटी देणार असल्याचे आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले.

या आयमा औद्योगिक प्रदर्शनामध्ये इंजिनिरिंग, मशीन टूल्स, मंचत्रनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व इंडस्ट्रियल कंझ्यूमर्स, टेक्स्टाईल्स, आयटी व ऑफीस ऑटोमेशन, नॉन कन्व्हर्शनल एनर्जी, सोलर सिस्टिम, बँकिंग इंशुरंस, फायनान्स एजुकेशन, ट्यूरिझम तसेच फूड प्रॉडक्ट्स करिता स्वतंत्र अद्ययावत दालनाचेनियोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची 3 विभागात विभागणी करण्यात आलेली असून, त्यात ओपन स्पेसचे स्टॉलही उपलब्ध करण्यात आले आहेत.

या सोहळ्यात उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, इंडेक्स चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बुब, माजी अध्यक्ष वरुण तलवार, राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र कोठावदे, योगिता आहेर, गोविंद झा व आयमा कार्यकारिणीने केले आहे.

औद्योगिक प्रदर्शन हाऊसफुल

आयमा इंडेक्स हे प्रदर्शन आधीपासूनच आरक्षित होते. लोकांच्या मागणीवरुन डोम वाढवले होते. मात्र ते देखील फुल्ल झाले असल्याचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले. या प्रदर्शनात प्रामुख्याने मॅग्नेटिक महाराष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन, एमआयडीसी,जिंदाल, एचएएल यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. गोविन्द झा ग्रुप, रॉयल इंक अँड इक्विपमेंट, अलोक लेबर ऑर्गनायझेसशन, हिरानंदानी, हॉस्पिटॅलीटी पार्टनर रॅडिसॅन, एसएमबीटी,युनिव्हर्सल कॉम्युनिकेशन्स,ऑल इंडिया गिफ्ट्स मॅनेजर तसेच महानगरपालिका, महावितरण, एमटीडीसी, एमपीसीबी, एनएसआयसी, आदींद्वारे प्रायोजकत्वाच्या माध्यमातून प्रदर्शनाला पाठबळ दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या