लोकल ट्रेन सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांना आला फोन; मुंबईत एकच खळबळ

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । Mumbai

मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर (Terrorist Attack) असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) करण्यात येण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. त्यावेळी नियंत्रण कक्षात कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस शिपायाने फोन करणाऱ्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली. कोणत्या ट्रेनमध्ये आणि कुठे बॉम्ब ठेवला? असं महिला पोलिसाने या व्यक्तीला विचारलं. त्यावर संबधित व्यक्तीने कोणतंही उत्तर दिलं नाही.

Imran Khan : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा, ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी!

मात्र, त्याने कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, आपण जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचे सांगत त्याने फोन कट केला. पोलिसांनी त्याच्या फोनचे लोकेशन ट्रॅक केले असता, या व्यक्तीने जुहूच्या शाह हाऊस मोरगांव येथून फोन केल्याचं समजतंय. कालांतराने फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा मोबाइल बंद केला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबधित स्थानकावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत कळवले आहे. पोलिसांनी हा फोन नक्की जुहूमधून आला होता का? फोनवर बोलणारी व्यक्ती कोण होती? तिला ही माहिती कुठून मिळाली? या व्यक्तीचा मूळ उद्देश काय होता यासंदर्भातील तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *