Friday, April 26, 2024
Homeनाशिकबोलठाणच्या जवानाचा नेपाळ सीमेवर मृत्यू

बोलठाणच्या जवानाचा नेपाळ सीमेवर मृत्यू

बोलठाण । वार्ताहर Bolthan

नेपाळ सीमेवर (Nepal border) कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka border) जवानाला सीमेवर 11 केव्ही विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. (Soldier dies in an accident) अमोल हिम्मतराव पाटील (वय 30) असे वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे. जवान अमोलच्या निधनांची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुका शोकसागरात बुडाला….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील वीरपूर सीमेवर (Veerpur border nepal) कार्यरत असलेला अमोल हा जवान सहकार्‍यांसोबत सीमेवर तैनात होता. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेचा धक्का बसला यात त्यांना वीरमरण आले.

या अपघातात अन्य दोन जवानांना देखील वीरमरण आल्याचे समजते. जिद्द आणि चिकाटीमुळे अमोल गेल्या सहा वर्षपूर्वी सशस्त्र सीमा बलमध्ये निवड झाली होती. नुकताच दिवाळी सणात अमोल बोलठाण येथे सुटीवर आलेला होता. जातांना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांची चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता.

जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. जवान अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांचे आधीन राहून त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे (Nandgaon Tahasildar Sidharth More) यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या