Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनरनवे ३४ नंतर अजय देवगणच्या 'या' चित्रपटाची होतेय चर्चा

रनवे ३४ नंतर अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटाची होतेय चर्चा

मुंबई । Mumbai

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgan) हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.मागील काही दिवसांपूर्वी त्याचा ‘रनवे ३४’ (Runway 34) चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर आता त्याचा ‘भोला’ (bholaa) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे…

- Advertisement -

अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले की, तो अभिनया बरोबरच आता चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन करणार आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी तो त्याच्या चौथ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘भोला’ असून हा तमिळ भाषेतील ‘कैथी’ (Kaithi) चित्रपटाचा रिमेक आहे. भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन अगोदर धर्मेंद्र वर्मा करणार होते. पंरतु चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी अजयने आता स्वतःकडे घेतली आहे. तसेच त्याने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरही एक फोटो सुद्धा शेअर केला आहे.

दरम्यान, अजय देवगणने १९ एप्रिल २०२२ रोजी ‘भोला’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच त्याचा ‘भोला’ हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला होता की, या चित्रपटाची तयारी आधी केली होती. कॅमेऱ्याच्या मागे जाण्याचा आणि लाईट, कॅमेरा, अॅक्शन असे तीन जादूचे शब्द बोलण्याचा पुन्हा प्रश्न होता.असे त्याने सांगितले होते.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या