Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकविधानसभा उपाध्यक्षांंनी धरला संबळाच्या तालावर ठेका

विधानसभा उपाध्यक्षांंनी धरला संबळाच्या तालावर ठेका

ओझे | वार्ताहर Oze

गाव उत्सवामुळे सर्व समाज एकत्र येत धार्मिक सामाजिक सलोखा राखला जात असून बोहाडा ( Bohada ) व इतर पारंपरिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत संस्कृती जपली जाणे आवश्यक असल्याचे असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं ( Bopegaon ) येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal )यांनी भेट दिली व उत्सवात पांडव मुखवटा धारण करत सदर उत्सवात सहभागी होत मुखवट्याची मिरवणूक काढत संभळाच्या तालावर ठेका धरला.

यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.झिरवाळ यांचे बोहड्यातील सक्रिय सहभागाने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.युवकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत नाचत आनंद साजरा केला .झिरवाळ यांचे सरपंच वसंत कावळे यांनी स्वागत केले. बोहड्याची माहिती वसंतराव रुंजा कावळे यांनी दिली. बोहाडा उत्सवात विविध धार्मिक देखाव्यांच्या वाजत गाजत मिरवणूक होत संस्कृती जपली जात आहे.

यावेळी कादवा चे संचालक सुकदेव जाधव,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, जिप सदस्य आत्माराम कुंभार्डे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शाम हिरे,रघुनाथ गायकवाड,डॉ.अनिल सातपुते,शरद महाले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या