तेराव्यानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपण

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील किर्तांगळी येथे कै. संजय नामदेव चव्हाणके यांच्या तेराव्यानिमित्त नातेवाईकांकडून रक्तदान शिबिर (Blood donation camp) व वृक्षारोपण कार्यक्रमाचे (tree plantation) आयोजन करण्यात आले.

नुकतेच चव्हाणके यांचे निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. मात्र, मोठ्या धीराने याला सामोरे जात कुटुंबाच्यावतीने हा उपक्रम हाती घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला. गावातील तरुणांनीही एकत्र येत यासाठी परिश्रम घेतले. चव्हाणके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करुन झाडांना सरंक्षण (Tree protection) जाळ्याही बसवण्यात आल्या.

यानंतर तरुणांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले. नवजिवन रक्त पेढी यांच्या माध्यमातून 51 बॅगचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच दगु चव्हाणके, संतोष चव्हाणके, सुदाम चव्हाणके, राजेंद्र चव्हाणके, संतोष चव्हाण, चंद्रभान चव्हाणके, संदीप चव्हाणके, पंकज चव्हाणके, नितीन चव्हाणके, शांताराम चव्हाणके, निखिल चव्हाणके, रघुनाथ कांदळकर, अंकित चव्हाणके, दीपक चव्हाणके, नारायण चव्हाणके, पोपट चव्हाणके आदींनी रक्तदान केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *