Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ विभागात पोलिसांकडून नाकाबंदी

भुसावळ विभागात पोलिसांकडून नाकाबंदी

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

भुसावळ शहरासह विभागात 11 रोजी रात्री पोलिसांकडून (Police) करण्यात आलेल्या नाकाबंदीत (Blockade) तब्बल 680 वाहनानची तपासणी करण्यात आली. मोटर वाहन कायद्यानुसार 108 जणांवर तसेच मद्यपान करुन वाहन चालवविणार्‍या 7 तर विना नंबर प्लेट लायसन्सच्या 79 केसेस तर 20 बी.पी. अ‍ॅक्ट तर 1 प्रोव्हिशन अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर Breaking # भाजपा-शिंदे गटाच्या साथीने
पवारांनीच उलथविली राष्ट्रवादीची सत्ता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात विना नंबर प्लेट वाहनांचा वापर हा जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी यासाठी केला जातो. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे अशी वाहने चोरीची आहे किंवा काय या पडताळणी करण्याच्या दृष्टीने 11 रोजी सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, बाजारपेठ, तालुका त्याच प्रमाणे शहर वाहतूक शाखेमार्फत शहरामध्ये सहा तर तालुक्यात एक अशा 7 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

राज्यात खडसेंची वाढली पत, जिल्ह्यात मात्र पानीपत

या नाकाबंदी दरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावल नाका व समता नगर भागात 185 वाहनांची तपासणी केलीतर 35 वाहनांवर मोटर वाहन कायद्यदनुसार तर 13 जणांवर विना नंबर प्लेट व लायसन्सच्या केसेस करण्यात आल्या. बाजारपेठ हद्दीतील अष्टभुजा देवी मंदीर, पांडुरंग टॉकीज भागात 140 वाहनांची तपासणी करुन 12 वाहनांनवर मोटर वाहन कायदा तर 10 जणांवर विना नंबर प्लेट व लायसन्सची कावराई झाली. एकावर ड्रंक अँड ड्राईव्हची तसेच 17 जणांवर बीपी अ‍ॅक्ट 102/117 ची कारवाई झाली. तालुका हद्दीतील कुर्‍हा (पानाचे) येथे 80 वाहनांची तपासणी केली.

11 वाहनांवर कारवाई तर दोघांवर लायसन्स व विनानंबर प्लेट तर एकावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाईसह 1 प्रेव्हिशन 65 (ई) तर वाहतुक शाखेने 250 वाहनांची तपासणी करुन 44 जणांवर एमव्हीए अ‍ॅक्ट, 24 जणांवर विना नंबर प्लेट, लयसन्सच्या तर 3 ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात आल्या.

शहरात विना नंबर प्लेट वाहनांचा वापर हा जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी यासाठी केला जातो. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे अशी वाहने चोरीची आहे किंवा काय याची पडताळणी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या