Thursday, April 25, 2024
Homeजळगावरेशन वाटपात काळाबाजार

रेशन वाटपात काळाबाजार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जळगावसह अन्य तालुक्यात दि.25 तारखेनंतर जिल्हा पुरवठा विभागाकडून (District Supply Department)माल दिल्यानंतर रेशन धान्यदुकानदारांनी (Ration grocers) वाटप केलेल्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार (black market of grain) होत असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाकडे या प्रकाराची सखोल चौकशी (Inquiry)करण्याची मागणी केल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता (Right to Information Activist Deepak Kumar Gupta) यांनी गुरुवारी हॉटेल मोरोका येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

- Advertisement -

गुप्ता पुढे म्हणाले की, दर महिन्याच्या 23 तारखेला जिल्हा गोडावूनमधून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना धान्यांचे वितरण केले जाते. त्यानंतर संबंधित रेशन दुकानदार हे दि.24 व 25 तारखेला रेशनधान्य वाटप करतात. शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप करीत असताना दिवसभरात दिलेले धान्याचे ऑनलाइन सिस्टममध्ये अपडेट करणे अनिवार्य आहे.मात्र, काही दुकानदार हे ऑनलाइन अपडेट करीत नाही. तर काही ठिकाणी थम सिस्टममध्ये देखील फेरफार करुन रेशन धान्याचा काळाबाजार करत आहे, असा आरोपही दीपककुमार गुप्ता यांनी केला.

जळगाव तालुक्यात एकूण 123 रेशन दुकानाचे परवाना दिलेला आहे. एका दुकानातून जवळपास 10 क्विंटल धान्याचा काळाबाजार दरमहिन्याला होत आहे. त्यातच धरणगाव, पाचोरा, पारोळा येथील रेशन दुकानांना दिला जाणारा रेशनचा माल हा काळा बाजारात जात असून हा ट्रक रेशनदुकानांवर न जाता थेट गुजरातमधील एका कंपनीतून गव्हाचे पीठ तयार करुन ते सीलबंद केले जात असल्याचा आरोप गुप्ता यांंनी केला आहे. रेशनच्या काळाबाजार संदर्भात तक्रार दिल्यानंतर जळगाव तालुका तहसील कार्यालयातील 123 दुकानांना तहसीलदारांनी याबाबत नोटिसा दिलेल्या आहेत.

प्रधानमंत्री कल्याण

योजनेमध्येही घोळ

प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत कोरोना काळात लाभार्थी नागरिकांना मोफत धान्य देण्यात आले. यात प्रत्येक व्यक्तीला 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ, तर सणवारांना 2 किलो साखर असे वाटप करण्यात येते. मात्र, या ठिकाणीही प्रशासनाकडून 25 तारखेनंतर रेशनदुकानदारांना वाटप केलेले धान्य दोन ते तीन दिवस वाटप केले जाते.त्यानंतर दुकाने बंद राहत असल्याने लाभार्थीही या योजनेपासून वंचित राहतो. तसेच थम्स चेकच्या नावाने या योजनेतही मोठा घोळ झाल्याचा आरोप गुप्ता यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या