Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभाजपा नेत्यांचा मुंबईतील एफडीए कार्यालयात ठिय्या

भाजपा नेत्यांचा मुंबईतील एफडीए कार्यालयात ठिय्या

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यास ऑक्सीजन व रेमडीसीवर मिळवण्यासाठी भाजपा नेत्यांचा मुंबईत एफ डी ए कार्यालयात ठिय्या माडताच नाशिकसाठी 100 मेट्रिक टन ऑक्सीजन आणि सुमारे 2000 रेमडीसीवर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले,अशी माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक जिल्हा हा करोना संक्रमणाच्या विळख्यात सापडला असून जिल्हाभरात अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे .वाढत्या रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी 400 ते500 रेमडीसीवर इंजेक्शन चा पुरवठा नाशिक जिल्ह्याला होत असल्याने अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

तसेच नाशिक जिल्ह्यासाठी;125 मेट्रिक टन ऑक्सीजन ची गरज असतांना तो फक्त सरासरी 70 मेट्रिक टनच मिळत असल्याने अनेक रुग्ण हे ऑक्सीजन अभावी दगावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचे महापौर सतीश कुलकर्णी ,दिंडोरी लोकसभेच्या खा.डॉ भारती पवार ,आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे , संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांत जाधव, भाजपा सभागृह नेते सतिश सोनवणे , भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी एफ डी ए चे सेक्रेटरी विजय सौरभ यांच्याशी चर्चा केली व त्यांना नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अवगत केली.

जो पर्यंत यावर योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,अशी भूमिका सर्व शिष्टमंडळाने घेतली असता त्यांनी नाशिक साठी 100 मेट्रिक टन ऑक्सीजन आणि सुमारे 2000 रेमडीसीवर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले.

तसेच ही बैठक चालू असतांना एफ डी ए चे आयुक्त परिमल सिंग , एफ डी. ए .महाराष्ट्र उप आयुक्त विजय वाघमारे ,नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेसह सर्व शिष्ट मंडळाची तातडीने व्हिडिओ काँन्फरन्स घेणात आली व नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी वाढीव रेमडीसीवर व ऑक्सीजन उपलब्ध करून घेण्याचे लेखी आश्वासन घेतले.

यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना पुरेशा प्रमाणात उपचारासाठी रेमडीसीवर व ऑक्सीजन मिळण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या