Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऊसतोडणीसाठी भाजपची बैठक

ऊसतोडणीसाठी भाजपची बैठक

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

निफाड तालुक्यातील (niphad taluka) उसाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांकडे (farmers) मोठ्या प्रमाणात व शिल्लक असल्याने या उसाचे काय करायचे? हा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात भाजपचे (bjp) ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील (Sureshbaba Patil) यांच्या अध्यक्षतेखाली कुंदेवाडी (kundewadi) येथील त्यांच्या फार्म हाऊसवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

निफाड (niphad) परिसरातून आजपर्यंत ज्या ज्या कारखान्यांनी सातत्याने गाळपासाठी ऊस (cane) नेला. त्या कारखान्यांना भेटी देऊन उर्वरित शिल्लक राहिलेल्या ऊसा संदर्भात चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. निफाड तालुक्यात कादवा (kadva), गोदावरी (godavari) त्याचप्रमाणे नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar), पालखेड (Palakhed) डावा कालवा व अन्य सिंचनाच्या व्यवस्था असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती (Sugarcane farming) केली जाते. अलीकडे द्राक्ष शेतीच्या विविध समस्यांना सामोरे जाऊन कर्जबाजारी झालेला शेतकरी हळूहळू ऊस शेतीकडे वळला आहे.

निफाड आणि त्यापाठोपाठ रानवड साखर कारखाना (Ranwad Sugar Factory) हे बंद झाल्याने निफाडच्या शेतकर्‍यांपुढे उसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यात यावर्षी रानवड सहकारी साखर कारखाना आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांच्या स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने चालविण्यास घेतला. रासाकाने आता गाळपाला चांगलाच वेग धरला आहे. तरी दोन साखर कारखान्यांचे उसाचे क्षेत्र असलेला हा परिसर असल्याने प्रचंड प्रमाणात उसाचे पीक शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन वर्षापासून पर्जन्यमान चांगले झाल्याने प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

तसेच द्राक्ष शेतीपासून शेतकरी (farmers) ऊस शेतीकडे वळला आहे. त्यामुळे हा उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोदाकाठच्या कोठुरे, करंजगाव, चापडगाव, कुरुडगाव, काथरगाव, सुंदरपूर, शिवरे, तामसवाडी, तारुखेडले, करंजी, खानगाव आदींसह गोदाकाठ परिसरात साधारणपणे 25 टक्के ऊस शिल्लक आहे. आजपर्यंत निफाड तालुक्यातून संजीवनी, कोळपेवाडी, प्रवरा, संगमनेर, अगस्ती, द्वारकाधीश, कादवा आदी कारखान्यांनी ऊस घेतला आहे. या साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने भेटी देऊन निफाड तालुक्यातील उसाकरिता निवेदन देऊन चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, यतिन कदम, जगन कुटे, शिवनाथ कडभाने, आदेश सानप, डॉ.सारीका डेर्ले, मनोज भुतडा, संजय गाजरे, सचिन मोगल, नितिन जाधव, मोतीराम मोगल, प्रविण वडघुले, राजू निकम, अमोल वडघुले, जगदीश कुशारे, विष्णू ढोमसे, लक्ष्मण निकम, नितिन कोरडे, सुयोग गिते, संतोष कोरडे, प्रशांत गोसावी, रामकृष्ण वाळूंज, वैभव कापसे, सचिन धारराव, नवनाथ धारराव, किरण धारराव, विजू केदार, पप्पू वाघ, योगेश वाघ, पांडू शिंदे, किरण जगताप, राजू शिंदे, सुधाकर मोगल उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या