Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशरशिया-युक्रेन युद्धादरम्यान हॅकर्सनी जे पी नड्डा यांना केले लक्ष्य, ट्विटर हॅक करून...

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान हॅकर्सनी जे पी नड्डा यांना केले लक्ष्य, ट्विटर हॅक करून मागितली क्रिप्टोकरन्सी

दिल्ली | Delhi

भाजपाचे (( BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचे ट्विटर अकाउंट हॅक (Twitter Account Hack) झाले होते. हॅकर्सनी रविवारी सकाळी त्याचे अकाउंट हॅक करून ट्विटही केले.

- Advertisement -

आज सकाळीच जे. पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मी रशियाच्या (Russia) लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचं (cryptocurrency) दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. पण, याच ट्विटमध्ये खाली माझा युक्रेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं हिंदीमध्ये लिहिलं आहे.

तसेच हॅकर्सनी प्रोफाइलचे नाव बदलून ICG OWNS INDIA केले होते.टि्वटरकडून जे. पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक रिकव्हर करण्यात आले आहेत. हँकर्सचे ट्विट डिलीट करण्यात आले आहेत. सर्व वादग्रस्त ट्विट काढून टाकण्यात आले आहेत.

यापूर्वी मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींचे (PM Modi) ट्वीटर अकाउंटही हॅक झाले होते. याद्वारे एक ट्वीट केलं गेलं होतं की, भारताने बिटकॉइनला अधिकृतरित्या कायदेशीर मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे पीएमओने (PMO) म्हटले होते. या प्रकरणाची दखल ट्वीटरकडून घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच मोदींचे ट्वीटर अकाउंट सुरक्षित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या