नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी प्रगणना

jalgaon-digital
3 Min Read

निफाड। आनंदा जाधव Niphad

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात Nandurmadhyameshwar Bird Sanctuary या हंगामातील तिसरी मासिक प्रगणना e third monthly census मंगळवारी (दि.30) पूर्ण करण्यात आली असून या प्रगणनेत 27810 पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल शेखर देवकर, वनरक्षक संदीप काळे यांनी दिली आहे.

थंडीची चाहूल लागत असतांनाच येथील पक्षी अभयारण्यात देखील देश-विदेशातून येणार्‍या पक्ष्यांची संख्या वाढतांना दिसत आहे. या हंगामातील तिसरी पक्षी प्रगणना दि.30 नोव्हेंबर रोजी वनविभाग, पक्षिमित्र, अभयारण्यातील गाईड यांचे मदतीने सोशल डिस्टन्स पाळून धरण परिसर, काथरगाव, कुरुडगाव, कोठुरे, चापडगाव, मांजरगाव अशा सहा ठिकाणी पूर्ण करण्यात आली. त्यासाठी 6 गट तयार करून प्रत्येक गटाला विशिष्ट परिसर नेमून देण्यात आला होता.

या पक्षी निरीक्षणात विविध पानपक्षी, झाडावरील, गवताळ भागातील असे एकूण 27810 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यात पाणलोट व गवताळ भागातील 25624 पानपक्षी तर झाडावरील व गवताळ परिसरातील 2186 अशा पक्ष्यांचा समावेश असून यात फ्लेमिंगो, ऑस्पप्रे, कॉमन क्रेन, नॉर्यन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गडवाल, रूडी शेल डक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, ब्लू थ्रोड, ब्लू चिक बी इटर, गोल्डन फ्लॉवर तसेच स्थानिक स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉटबील डक, स्पूनबिल, रिव्हीर टर्न, प्रॅन्टिकोल, कमळपक्षी, शेकाट्या, नदीसूरय, खंड्या आदी पक्षी आढळून आले आहे.

थंडीच्या आगमनाबरोबरच स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येणार आहे. साहजिक पुढील काही दिवसात नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांनी गजबजणार आहे. या हंगामातील नुकत्याच झालेल्या तिसरी मासिक पक्षी प्रगणनेत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक विक्रम अहिरे,

वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल प्रितिश सरोदे, वनरक्षक संदीप काळे, . आशा वानखेडे, वनमजूर ज्ञानेश्वर फापाळे, पक्षिमित्र आनंद बोरा, अनंत सरोदे, संग्राम गोवर्धने, रुपेश कुकडे, हर्षद टकले, राहूल वडघुले तसेच अभयारण्यातील गाईड रोशन पोटे, अमोल दराडे, शंकर लोखंडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, ओंकार चव्हाण, अमोल डोंगरे, गंगाधर आघाव, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजू गायकवाड, विकास गारे, अजय पावडे आदींसह वेटलॅन्ट ग्रुपचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

दरम्यान पुढील काही दिवसात पक्ष्यांच्या संख्येत देखील वाढ होण्याचे संकेत मिळू लागले असून पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षणाची मेजवानी ठरणार आहे. साहजिकच डिसेंबर ते मार्चपर्यंत या अभयारण्यात देश-विदेशातील पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींनी अभयारण्य परिसर गजबजणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *