वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्सच – मेधा पाटकर

पुणे |प्रतिनिधी| Pune

कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स हाच असल्याचा दावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.

ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या.

पाटकर म्हणाल्या, बिल गेट्स फाऊंडेशनने पूर्ण जगातील शेतीवर कब्जा करण्याचा डाव आखला आहे. गेट्स हा स्वतः अमेरिकेतल्या दोन लाख 40 हजार एकराचा मालक आहे. कोरोना ज्या लॅबमधून निघाला, त्या लॅबचा मालक दुसरा तिसरा कुणी नसून, गेट्स हाच आहे. हे सारे धक्कादायक असेच आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दखल न घेतल्याने शेकडो शेतकऱयांना जीव गमवावा लागला. आता त्याच तोमर यांनी बिल गेट्स यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. श्रमिकांचे हाल झाले. त्यादरम्यान पीएम केअर फंड तयार करण्यात आला. त्यामध्ये हजारो कोटी रुपये आले, ते हजारो कोटी कुठे गेले, याचे उत्तर कुणाजवळ नाही. त्यावेळी नऊ आंतरराष्ट्रीय सावकारी संस्थांकडून तब्बल ४० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. या फंडाचा उपयोग कुठे झाला? या फंडातून किमान प्रत्येकाच्या खात्यात १० हजार रुपये घालायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले.

ऊसतोडणी कामगारांची अवस्था दयनीय

ऊसतोडणी कामगारांची कैफियत मांडताना त्या म्हणाल्या, या कामगारांना पहाटे 3 च्या सुमारास कामाला जुंपले जाते. लहान मुले घरात असूनही आया काम करीत असतात. खोपटं आणि पालामध्ये हे कामगार राहतात. त्यांना वेतन किती, कुणाला माहीत नाही. पगाराचा कागद हातात मिळत नाही. किमान वेतनही मिळत नाही, अशी अवस्था आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *