Friday, April 26, 2024
Homeनगर‘त्या’ चोरट्याने दिली 23 दुचाकी चोरल्याची कबुली

‘त्या’ चोरट्याने दिली 23 दुचाकी चोरल्याची कबुली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातून एक, दोन नव्हे तर तब्बल 23 दुचाकी चोरल्याची कबुली दुचाकी चोराने तपासात दिली आहे. तोफखाना पोलिसांनी सुमारे 16 लाख रूपये किंमतीच्या या सर्व दुचाकीं जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

नगर शहर, उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. किसन ऊर्फ कृष्णा पोपट सापते (वय 26, रा. खकाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुरूवातीला आठ दुचाकीं पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. किसन सापते हा वाहन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करत होता. त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने 70 ते 80 हजार रूपये किंमतीला विक्री केली होती. पोलीस तपासात त्याने 23 दुचाकीं चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांच्या पथकातील उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, सतिष त्रिभुवन, शिरष तरटे, सचिन जगताप, धिरज खंडागळे, चेतन मोहिते, गौतम सातपुते, अतुल कोतकर, प्रशांत राठोड यांनी आरोपी सापते याला बीड जिल्ह्यातून अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या