Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमुलांची अडचण दूर करण्यासाठी रोटरीचा पुढाकार ; उडाणच्या माध्यमातून पंखांना उभारी देण्याचा...

मुलांची अडचण दूर करण्यासाठी रोटरीचा पुढाकार ; उडाणच्या माध्यमातून पंखांना उभारी देण्याचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी

गरजवंतांच्या गरजा भागवण्यासाठी केलेले कार्य म्हणजेच स्प्रेड ऑफ जॉय ही संकल्पना बहुतांश प्रमाणात रोटरी भागवत आले आहे. याही कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची अडचण दूर करण्यासाठी त्याना उडान भरता येण्यासाठी सायकलच्या पायडल माध्यमातून पंख उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या माध्यमातून मुले गरुड भरारी घेतील असा विश्वास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वलावलकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

रोटरी ३०३० च्या माध्यमातून उडान या संकल्पनेवर आधारीत उपक्रमात त्या बालत होत्या. यावेळी व्यासपिठावररोटरी ३०३० च्या नुतन प्रांतपाल अशा वेणूगोपाल, आ.सिमा हिरे, रोटरी ३०३० चे माजी प्रांतपाल आनंद झूनझूनवाला, शब्बीर शाकिर, राजीव शर्मा, संग्रमसिंग भोसले, निवडलेले आगामी प्रांतपाल राजेंद्र खुराणा हे होते.

यावेळी जिल्हाभरातील ५५०० मुलांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात त्यापैकी ११०० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. या वाटप समारंभात शर्मिेष्ठा वालावलकर बोलत होत्या. यावेळी बोलताना आ सिमा हीरे यांनी रोटरी क्लबचे ब्रिद वाक्य समाजाची सेवा हेच आहे.त्यामुळे या साकलच्या माद्यमातून समाजातील तळागाळातील लोकांच्या मदतीचे मोठे काम हाती घेतलेले आहे. त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहु शकलो यांचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी या उपक्रमाबद्दल सातत्याने मनात विचार घोळत होते. मुलांचे शिक्षण थांबू नये. त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मुलांनी चांगले शिक्षण घेउन शहराचा देशाचा गौरव वाढवण्याचे काम करण्याच्या शुभेछा दिल्या.

यावेळी आनंद झूनझूनवाला शब्बीर शाकिर यांनी मनोगत व्यक्त करुन उपक्रमाचे कौतूक करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी फर्स्ट जन्टलमन वेणूगोपाल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी स्वत: या सायकल खरेदीसाठी निम्मा खर्च उचललेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयंत खैरनार यांनी तर आभार शहरातील २२ क्लबच्या संयुक्त समितीच्या वतीने सौमित्र दास यांनी मानले. कार्यक्रमात माजी स्थायी समिती सदस्य सलीम शेख व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटील आदींसह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या