Friday, April 26, 2024
Homeनगरभोजापूर धरणाची उंची दोन मीटरने वाढवा

भोजापूर धरणाची उंची दोन मीटरने वाढवा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

नाशिक जिल्हातील सिन्नर व अहमदनगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यांमधील कायमस्वरूपी दुष्काळी निमोण- तळेगाव पंचक्रोशीत असलेल्या भागास जीवनदायी ठरलेल्या भोजापूर धरणाच्या सांडव्याची उंची एक ते दोन मीटरने वाढवावी जेणेकरून लाभक्षेत्रातील जमीन आणखी ओलिताखाली येईल, अशी मागणी करणारे निवेदन भाजप अभियांत्रिकी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisement -

भोजापूर धरणाची साठवण क्षमता 483 द.ल.घ. फूट इतकी या प्रकल्पाचे लाभक्षेत्र सिन्नर तालुका 1875 हेक्टर व संगमनेर तालुका 1032 हेक्टर इतके आहे. या धरणामुधन सुमारे 19 किलोमीटर लांबीचा डावा कालवा निघतो. या कालव्याद्वारे सिन्नर व संगमनेर तालुक्यातील निर्माण पंचक्रोशीसह नांदूरशिंगोटे, दोडी खुर्द व बुद्रक इ. 16 गावांसह सुमारे 5000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली भिजविण्याचे अतभुत करण्यात आलेले आहे. या धरणामधून सुमारे 100 द.ल.घ.फूट इतके पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे उचलण्यासाठी जल संपदा विभागाने वेळोवेळी मंजुरी दिलेल्या आहेत.

याचबरोबर प्रवाही सिंचनाद्वारे व संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, कर्‍हे, सोनेवाडी, नान्नजदुमाला, पारेगांव खुर्द व चिंचोली गुरव या गावांच्या पाणी योजनांच्या उद्भवामध्ये पिण्याचे पाणी सोडले जाते. या सर्व उपसा सिंचन योजनांमुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा निश्चितच कमी झालेला असून या सर्व बाबींमुळे धरणामधील उपयुक्त पाणी साठ्यात कमालीची घट झालेली आहे.

या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये निर्माण झालेली घट भरून काढणेसाठी धरणाच्या सांडव्याची उंची किमान एक ते दीड मीटरने वाढविणे अत्याश्यक आहे. या प्रकल्पाचे मूळ मंजूर प्रकल्प अहवालात धरणस्थळी निरीक्षण व अभ्यासाअंती एकूण सुमारे 1002 द.ल.घ.फूट येवा उपलब्ध आहे. मात्र प्रत्यक्षात 483 द.ल.घ. फूट इतका पाणी साठा असलेले भोजापूर धरण बांधण्यात आले असून अजुनही धरणस्थळी सुमारे 517 द.ल.घ.फूट इतके पाणी शिल्लक आहे.

सांडव्यावर गोडबोले गेट बसविण्याचे सुध्दा प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. भोजापूर धरणाची अथवा सांडव्याची उंची वाढविण्यासाठी यापुर्वीचे केंद्रीय जल संसाधन मंत्री व कॅबिनेट मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य, यांनी मा. मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक व अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण नाशिक यांना स्पष्ट आदेश दिलेले असताना नाशिक कार्यालयाकडून समन्यायीपाणी वाटप कायदा 2005 चा आधार घेऊन पाणीसाठा करता येत नसल्याची या कायद्याचा अभ्यास न करता मोघम शिफारस केली जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने हे धरण नव्याने बांधण्यात येत नसून जुन्या धरणामध्ये धरण स्थळी उपलब्ध असलेल्या पाणी येवा व या धरणाचा मंजूर पाणी वापर व प्रकल्पाचे मूळ पाणी साठ्यामध्ये 100 द.ल.घ. फुटापेक्षा जास्त न होणारी वाढ लक्षात घेता समन्यायी पाणीवाटप कायदा निश्चितपणे या प्रकल्पास लागू होत नाही.

भोजापूर धरण्याच्या सांडव्याची उंची किमान 1 ते 2 मीटरने वाढविल्यास मूळ पाणी साठ्यात अंदाजे 100 द. ल. घ. फुटापर्यंत वाढ होणार असून त्याद्वारे लाभक्षेत्रात किमान 400 ते 500 हेक्टर इतकी वाढ होणार आहे. तरी न्याय्य मागण्यांचा अभ्यासपूर्ण विचार करून भोजापूर धरणाच्या सांडव्याची उंची ही किमान 1 ते 2 मीटरने वाढविणे ही बाब शेतकर्‍यांच्या व जनतेच्यादृष्टीने गरजेची आहे. तसेच भोजापूर मुख्य डाव्या कालव्याची वहनक्षमता किमान तीनशे पर्यंत वाढवून सध्या अस्तित्वात असलेल्या कॅनाल वरील सर्व बांधकामे दुरुस्ती करणे, भोजापूर पूरचारी (तळेगाव दिघे) वरील बांधकामे व भराव दुरुस्त करणे इत्यादी मागण्या इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या