Thursday, April 25, 2024
Homeनगरभिस्तबाग रोडला दोन महिन्यांची डेडलाईन

भिस्तबाग रोडला दोन महिन्यांची डेडलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलिस स्टेशन चौक ते भिस्तबाग ते महालापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम

- Advertisement -

तसेच एमएसईबीचे अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे काम सुरू आहे. रोडचे काम दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले आहेत. तोफखाना पोलिस स्टेशन चौक ते भिस्तबाग ते महालापर्यंत रस्त्याचे कामाबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी नगरसेवक महेंद्र गंधे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संजय ढोणे, सतिष शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख आर. जी. मेहेत्रे, अभियंता मनोज पारखे, उद्यान विभाग प्रमुख यू. जी. म्हसे, इलेक्ट्रीक विभागाचे तिवारी आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले की, ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकावयाची आहे ते काम येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करावे. एमएसईबीकडून अंडरग्राऊंउ केबल टाकण्याचे काम सुरू आहे ते लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्यामध्ये काही कामासाठी रस्ता खोदावा लागल्यास संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, यादृष्टीने अधिकार्‍यांनी देखील संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

गंधे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास होत आहे. काही ठिकाणी रस्त्याला क्रॉसिंग पाईपलाईन टाकून ठेवाव्यात. बर्‍याच भागात अडचणी सुटलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता करण्यास कोणताही अडथळा नाही. मनपाच्या संबंधीत अधिकारी यांनी देखील ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या तातडीने सोडवाव्यात. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा दयावा असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या