Wednesday, April 24, 2024
Homeनगरभारतीय जनता पार्टी कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी

भारतीय जनता पार्टी कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती भाजपा कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतल्या. यावेळी प्रत्येक प्रभागातील इच्छुक शिष्टमंडळ घेऊन शक्तीप्रदर्शन करत असल्याने कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

- Advertisement -

अकोले नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षाची व्युव्हरचना सुरू झाली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकोलेतील पक्ष कार्यालयात नगरपंचायतीला इच्छुक असणार्‍या कार्यकर्त्यांच्या मुलाखती संपन्न झाल्या. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सोनालीताई नाईकवाडी, जि. प. चे अर्थ व बांधकाम चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, भाजप जिल्हा परिषद गटनेते जालिंदर नाईकवाडी, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते जे. डी. आंबरे, शिवाजीराजे धुमाळ, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष सचिन शेटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशुराम शेळके आदी उपस्थित होते.

याप्रसंगी 35 ते 40 इच्छुक उमेदवारांनी शिष्टमंडळासह मुलाखती दिल्या. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर माजी आ. वैभव पिचड म्हणाले, अकोले विधानसभा निवडणूक होवून दोन वर्ष झालीत रस्ते, विकास कामांचे नावाने ओरडणार्‍यानाही आमदार होवुन दोन वर्ष झालीत मात्र तालुक्यात एकही विकास काम होताना दिसत नाही. तालुक्यात आपण तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी मंजूर व उद्घाटन केलेल्या कोल्हार घोटी राज्य मार्ग वगळता कुठेही रस्त्याचे काम सुरु नाही. पालकमंत्री यांना खरी माहिती न देता आपल्या काळातील मंजूर कामाचेच उदघाटन करण्याचा सपाटा सुरु आहे. अकोले नगरपंचायत निवडणुकीत सर्व प्रभागात आपला विजय निश्चित आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आता मरगळ दुर करून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन श्री. पिचड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या