Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशBest Bakery Case : दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

Best Bakery Case : दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

मुंबई | Mumbai

सन २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलींदरम्यान, बडोद्यातील बेस्ट बेकरी जळीतकांडात (Best Bakery Case) १४ जणांचा मृत्यू झाला होता. सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

- Advertisement -

२००२ मध्ये गोध्रा (Godhra) येथे साबरमती एक्स्प्रेसला (Sabarmati Express Fire) लावलेल्या आगीत कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे भडकले होते. त्याचवेळी हिंसक जमावाने बडोदा येथील बेस्ट बेकरीला आग लावली होती. या आगीत १४ जणांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी बेस्ट बेकरीच्या मालकांची मुलगी जाहिरा शेख हिने २१ जणांविरोधात तक्रार दिली होती.

Jack Dorsey : शेतकरी आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने धमकावलं; ट्विटरच्या माजी सीईओंचा खळबळजनक दावा

याप्रकरणी साल २००३ मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने (Fast Track Court) सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ताता केली होती. या खटल्यात झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना कोर्टाने फितूर घोषित केले होते. पुढे सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात हायकोर्टानेही कायम ठेवला होता.

त्यानंतर जाहिरा शेख हिने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा खटला गुजरातबाहेर चालवण्याचे आदेश दिले होते. पुढे हा खटला मुंबईतील स्पेशल कोर्टामध्ये (Mumbai Special Court) वर्ग करण्यात आला.

बेस्ट बेकरी प्रकरणात एकूण चार जणांविरोधात खटला सुरु होता. यातील दोघांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला होता. तर बेस्ट बेकरी हत्याकांड घडून तब्बल २१ वर्षे उलटल्यानंतर २ आरोपींबाबत न्यायालयाने फैसला दिला आहे.

Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका टळलेला नाही! २० हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

दरम्यानच्या काळात वडोदरा कोर्टाने फरार घोषित केलेल्या हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांच्यासह अन्य दोघांना तपास यंत्रणेने अजमेर ब्लास्ट प्रकरणी अटक केली.

मुंबईत चालवलेल्या खटल्यात या दोन्ही आरोपींना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. मुंबई कोर्टाने याप्रकरणी २१ पैकी ९ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

२०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या नऊ जणांपैकी पाच जणांची सुटका केली. तर २०१३ मध्ये अटक केलेल्या चारपैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे १० वर्षांपासून तुरुंगात होते. आज सत्र न्यायालयाने या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

मुख्यमंत्री शिंदेंची ‘त्या’ जाहिरातीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या